f

Get in on this viral marvel and start spreading that buzz! Buzzy was made for all up and coming modern publishers & magazines!

Fb. In. Tw.

सकारात्मक साथ

मुंबई टाइम्स टीम
पाळीव दोस्तांसोबत वेळ घालवणं हा आनंददायी अनुभव असतो. त्यांचं आजूबाजूला असणं, त्यांचा आवाज, त्यांना मारलेली मिठी चेहऱ्यावर हास्य खुलवते. अनेक संशोधनाअंती सिद्ध झालं आहे, की पाळीव प्राणी ताण-नैराश्य दूर करतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. याचा अनुभव अनेक पेट पालकांनी गेल्या वर्षी करोना काळात घेतला. याला कलाकारही अपवाद नाहीत. पाळीव दोस्तांच्या सहवासात वेळ घालवल्याने सकारात्मकता मिळते, हे कलाकारही मान्य करतात. त्यांच्यासोबत घालवलेले आनंददायी क्षण सोशल मीडियावरही शेअर करण्यात आले आहेत.

तीन दोस्त
प्रियांका चोप्रा-जोनसचं पाळीव दोस्तांवर प्रचंड प्रेम आहे. तिची ‘डायना’ सोशल मीडियावर स्टार आहे. ऑक्टोबरमध्ये प्रियांका युरोपला गेली होती. तेव्हा ‘डायना’लाही सोबत घेऊन गेली होती. तसंच, तिच्याकडे ‘जिनो’ आणि ‘पांडा’ हे पाळीव दोस्तसुद्धा आहेत. ‘पांडा’चा फोटो ऑनलाइन शेअर करताना तिनं लिहिलं आहे, की आमचा फॅमिली फोटो. पांडा, आमच्या कुटुंबात तुझं स्वागत आहे. आम्ही काही आठवड्यांपूर्वी या छोट्याला घरी आणलं.

नुसती धमाल
दिशा पटनीकडे चार पाळीव प्राणी आहेत. ते चौघंही खूप खेळतात. एवढंच नाही तर, दिशाने आपल्या पाळीव दोस्तांचं इन्स्टाग्राम अकाउंट सुरु केलं आहे. त्यावर पेट्सबरोबर घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांचे फोटो शेअर करत असते. चार पायांच्या दोस्तांसोबत केलेली धमाल तिचे चाहतेही एन्जॉय करत असतात.

आनंददायी क्षणांचं शेअरिंग
घरात पाळीव दोस्त असले, की आजारातून बरं व्हायला मदत होते. याचा अनुभव अभिनेत्री मलायका अरोरानं घेतला. मध्यंतरी तिला करोनाचा संसर्ग झाला होता. बरी झाल्यानंतर तिनं आपल्या पाळीव दोस्तासोबत एक फोटो शेअर केला होता. बाल्कनीमध्ये ‘कॅस्पर’बरोबर खेळत असतानाचा फोटो पोस्ट केला होता. यापूर्वी तिने ‘कॅस्पर’ आणि मुलाचा शेअर केलेला फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोला तिनं ‘फोटोतले दोघं माझे आहेत’ अशी कॅप्शन
दिली होती.

डिस्को आणि फोबी
क्रिती सेनन पाळीव दोस्तांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या वर्षी तिच्या घरी ‘फोबी’ नावाच्या नव्या दोस्ताची एंट्री झाली. त्याबाबत तिने पोस्ट लिहिली होती, की मला वेड लागलंय असं ‘फोबी’ला वाटत असावं; पण मला तो गोंडस वाटतो. क्रितीच्या ‘डिस्को’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते.

गोंडस ‘डूड’
अभिनेत्री अनुष्का शर्माच्या ‘डूड’चे फोटो बघितले नाहीत असा एकही चाहता नाही. ती सतत ‘डूड’सोबतचे फोटो शेअर करत असते. लॉकडाउनच्या काळात तिने ‘डूड’सोबत कसा वेळ घालवला हे शेअर केलं आहे. ‘माझ्या गोंडस ‘डूड’च्या सहवासात वेळ कसा जातो ते कळतच नाही,’ अशी कॅप्शन दिलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.

तो स्ट्रेस बस्टर!
श्रद्धा कपूर ‘शिलोह’ला स्ट्रेस बस्टर म्हणते. ती नेहमी ‘छोटू महाराज’चे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ‘आमच्या आयुष्यात आल्याबद्दल आणि आमच्यावर खूप प्रेम केल्याबद्दल ‘शिलोह’चे आभार मानते,’ अशी कॅप्शन एका पोस्टला दिली आहे. तिने #PetsGiveLove आणि #AnimalsAreFriends या हॅशटॅगसह आणखी एक फोट शेअर केला आहे.

अतूट बंध
अभिनेत्री अमायरा दस्तूरनं एका संस्थेतून पाळीव दोस्तांना दत्तक घेतलं. खंडाळा इथल्या घरात दोन कुत्री आणि मुंबईच्या घरी एक मांजर आहे. ती त्यांच्यासोबत घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशाच एका पोस्टमध्ये तिची मांजर ‘एम्मा’ झोपलेली दिसते. त्या फोटोला ‘अतूट बंध’ अशी कॅप्शन दिली आहे.

संकलन : प्रथमेश गायकवाड, विल्सन कॉलेज

Post a Comment
By clicking on Register, you accept T&C
X
X
X