f

Get in on this viral marvel and start spreading that buzz! Buzzy was made for all up and coming modern publishers & magazines!

Fb. In. Tw.

शेपूटवाल्यांची फॅशन जोमात

केतकी मोडक, विद्यावर्धिनीज कॉलेज

दिवाळी काही दिवसांवर आहे. त्या दृष्टीनं घराची साफसफाई, फराळ यांच्यासोबतच खास दिवाळीसाठी विविध ड्रेसेसची खरेदी करत असाल. अनेक पेट्स पालक आपल्या शेपूटवाल्या दोस्तालासुद्धा खास फेस्टिव्ह लूक देण्याच्या तयारीत आहेत. दोस्ताला फेस्टिव्ह लूक कशाप्रकारे देता येईल, लूक देताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात याबद्दल जाणून घेऊ या…

आऊटफिट आमचा भारी
तुमच्या पाळीव दोस्ताला फेस्टिव्ह लूक देण्यासाठी तुम्ही विविध प्रयोग करू शकता. शेला-पगडीला जरीच्या बॉर्डर्स, सोनेरी रंगाची लेस यासारख्या गोष्टी लावून तुम्ही त्यांना हट के लूक देऊ शकता. दिवाळी काही दिवसांवर आहे. त्यामुळे चार पायाच्या दोस्ताला खास लूक देण्यासाठी आऊटफिट्सवर दिवाळीसंबंधी विविध चित्र पेंट करू शकता. जॅकेट्सचा वापरसुद्धा तुमच्या शेपूटवाल्या दोस्ताला छान लूक देण्यासाठी उपयुक्त ठरेल. दुपट्ट्याचा वापर करून धोती, सलवार, फ्रॉक्स, स्कर्ट्सदेखील शिवू शकता.

पैठणीचा साजसणानिमित्त पारंपरिक लूक देण्यासाठी पैठणी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पैठणीच्या जॅकेटचा पर्याय तुमच्याकडे आहे. धोतीला पैठणीची बॉर्डर वापरून आकर्षक लूक देता येईल. पैठणीचे व्रॅप अराऊंड स्कर्ट्स शिवून घेऊ शकता. पैठणीच्या मटेरिअल्सचा वापर करून अंगरखेसुद्धा शिवू शकता. स्कर्ट्स शिवताना गाठ किंवा वेलक्रोचा वापर करता येईल. पैठणीचा वापर करून शिवलेला फ्रिलवाला फ्रॉक देखील छान पर्याय ठरू शकेल. या फ्रॉकवर न टोचणाऱ्या सोनेरी लेसचासुद्धा आकर्षकरित्या वापर करता येईल.

फेस्टिव्ह लूकला चार चांददोस्ताच्या लूकला चार चांद लावण्यासाठी आकर्षक माळा, हार यांचा वापर करता येईल. कृत्रिम फुलांचे हार, मोत्यांच्या माळा यांचा वापर केला तर शेपूटवाल्याचा लूक आणखीन खुलून दिसेल. प्राण्यांचे केस चेनमध्ये अडकण्याची शक्यता असते, त्यामुळे जर तुम्हाला चेनचा वापर करायचा असेल तर विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कानांवर स्टीकेबल फुलं किंवा विविध आकारांचे स्टीकर्स लावू शकता. हे स्टीकर्स लावताना ते सहजपणे काढता येण्यासारखे असतील आणि ते लावताना किंवा काढताना तुमच्या पाळीव दोस्ताला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

हेअरस्टाइल आणि बरंच काही!तुमच्या शेपूटवाल्या दोस्ताला लूक देण्यासाठी तुम्ही त्याच्या हेअरस्टाइल्स करू शकता. पोनी बांधू शकता. लांब केस असतील त्याची वेणीसुद्धा घालू शकता. लूक उठून दिसावा यासाठी तुम्हाला हेअरबँड्सचा वापर करता येईल. दोस्ताला त्रास होणार नाही असे विविध प्रकारचे हेअरबँड्स उपलब्ध असतात, त्यांचा वापर करता येईल. लाइट्स असलेले हेअरबँड्सही वापरू शकता. तुम्हाला हेअरबँड्सचा आणखीन कल्पकतेने वापर करायचा असेल तर त्याच्यावर तुम्ही छान पेंटिंगसुद्धा करू शकता.

Post a Comment
By clicking on Register, you accept T&C
X
X
X