f

Get in on this viral marvel and start spreading that buzz! Buzzy was made for all up and coming modern publishers & magazines!

Fb. In. Tw.

ठेवा अधिक लक्ष

मुंबई टाइम्स टीम

कुठेही मांजर आणि तिची पिल्ल दिसली की प्राणीप्रेमी थांबून, त्यांना गोंजारुन पुढे जातात. पण, फार क्वचितच मांजर तिच्या पिल्लांना हात लावून देते. सध्या मांजरींच्या प्रजननाचा काळ सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गोंडस, कापसाच्या गोळ्या समान भासणारी पिल्ल बघायला मिळतात. तुमच्या घरातील मांजरीलाही पिल्ल होणार आहेत? मग तिची कशी काळजी घ्यावी? कोणकोणत्या गोष्टींवर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे? असे प्रश्न तुम्हालाही सतावत असतील. तर गरोदर मांजरींची काळजी कशी घ्यावी याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊ या…

० कसं ओळखावं?

माजरींच्या आकारमानामुळे त्या गरोदर आहेत हे अनेकदा कळून येत नाही. अशा वेळी त्यांच्यात होणाऱ्या बदलांचं निरीक्षण पालकांनी करणं आवश्यक असतं. मांजरींमध्ये होणारे बदल पुढीलप्रमाणे…

– शारीरिक बदल- मांजर थकलेली जाणवू शकते. तसंच आहाराचं प्रमाण वाढतं. पाच आठवड्यानंतर मांजरीच्या पोटाचा आकार लक्षात येण्याइतपत वाढलेला असतो.

– स्वभावातील बदल- आधी तुमच्या जवळ येणारी मांजर अचानक एकटीएकटी राहू लागते. लाड करण्याच्या दृष्टीनं तुम्ही तिच्या जवळ गेलात तर ती तुम्हाला तिच्यापासून दूर राहण्याचा ईशारा देते, ही एक बाजू झाली. दुसरी बाजू म्हणजे तुम्ही तिच्याकडे पूर्वीपेक्षा अधिक लक्ष द्यावं हे तिच्या हालचालीतून सांगण्याचा प्रयत्न करु शकते. असे दोन विरुद्ध टोकांचे बदल जाणवू शकतात.

पशुवैद्यांचा सल्ला घेताय ना?

मांजरींचा गरोदरपणाचा काळ दोन महिन्यांचा असतो. या कालावधीत वेळोवेळी पशुवैद्यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक असतं. विशेषत: मांजरीसाठी आणि तुमच्यासाठी हा पहिला अनुभव असेल तर पशुवैद्यांच्या संपर्कात राहणं केव्हाही उत्तम! गरोदरपणात तुमच्या लाडकीला काय खायला द्यावं किंवा काय देऊ नये, जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर काय करावं अशा सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन पशुवैद्यांकडून मिळू शकतं. तसंच मांजरीचं बांळतपण घरी करायचं की हॉस्पिटलमध्ये हा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानं आधीच घेऊन ठेवा.

लक्षात ठेवा

जसजसा बाळंतपणाचा काळ जवळ येतो तसतसं तुमच्या मांजरीच्या स्वभावात काही बदल दिसू लागतात. ते पुढीलप्रमाणे…

– कमी हालचाल करते.

– भूक मंदावते.

– मांजरीच्या शरीराचं तापमान कमी होतं.

– पोटाकडचा भाग सतत चाटते.

सुरक्षित आसऱ्याच्या शोधात

मांजरी पिल्लांसाठी घरातल्या घरात सुरक्षित आसरा शोधून ठेवतात. सर्वसाधारणपणे एखाद्या कोपऱ्यात, अडगळीच्या ठिकाणी, कपाट किंवा पलंगाखाली अशा जागा शोधून ठेवते. थोडक्यात काय तर पिल्लांकडे लगेच नजर जाणार नाही आणि उबदार असा कोपरा शोधते. या कामासाठी तुम्ही तिला मदत करु शकता. घरातील पुठ्ठ्याचा बॉक्स किंवा बास्केटमध्ये स्वच्छ कापड ठेवू शकता.

वातावरण असू द्या आल्हाददायी

तुमच्या लाडकीच्या गरोदरपणात घरातील वातावरण आल्हाददायी असू द्या. मोठ्या प्रमाणात आवाज किंवा धूळ येत असेल तर विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. मांजरीचा वावर असलेल्या जागा स्वच्छ असू द्या.

० टिप्स

– मांजर फिट राहण्याच्या दृष्टीनं सक्रिय ठेवा. त्याचं प्रमाण जराजरी वाढलं तर ते मांजर आणि पिल्लांच्या दृष्टीनं धोकादायक ठरु शकतं.

– गरोदरपणात अधिक हालचाल होईल असे खेळ खेळू नका.

– तुमची लाडकी नैसर्गिकरित्या जेवढी सक्रिय आहे तेवढी असू द्या. उगाच व्यायाम करुन घेण्याच्या उद्देशानं तिला जास्त प्रमाणात हालचाल करायला लावू नका.

– ती जेवढी शांत राहील तेवढं तिच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

– खूप चिडचिड करत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

– आहारावर लक्ष ठेवा.

– नेहमीपेक्षा कमी खात असेल किंवा अन्नावरची वासना उडाली असेल तर ती धोक्याची घंटा आहे असं समजा. अशा परिस्थितीत तुमच्या लाडकीला तातडीनं डॉक्टरांकडे घेऊन जा.

– वेळोवेळी पशुवैद्यांचा सल्ला घ्या.

– पशुवैद्यांनी सोनाग्राफी करण्याचा सल्ला दिल्यास ती करुन घ्यावी. यामुळे पिल्लांची संख्या जाणून घेण्यास मदत होते.

००००

गरोदरपणात मांजरीची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. अगदी तिच्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून हालचालींपर्यंत सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं आवश्यक असतं. पिल्लांच्या आरोग्यादृष्टीनं मांजरींचं आधी लसीकरण करणं फायदेशीर ठरतं. तसंच गरोदरपणात मांजरीची सोनोग्राफी करण्याचा सल्ला हितावह ठरतो.

– डॉ. शिवानी तांडेल, पशुवैद्य

Post a Comment
By clicking on Register, you accept T&C
X
X
X